Sunday, 19 April 2020

यांत्रिक छपाई

आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत.

शिफ्ट फेड यंत्र - या यंत्रावर कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे एकाच जागेवर बदलत राहून छपाई होते. शीट फेड यंत्रामध्ये कोरे कागद रचून यंत्राच्या एका बाजूला ठेवले जातात. याच प्रकारच्या स्वयंचलित यंत्रांमध्ये एकेक कागद हवेच्या आकर्षणाने उचलला जातो आणि साच्याखाली सारला जातो. साच्यावरील शाईची प्रतिमा कागदावर उमटते व छपाई होते. छपाई झाल्यावर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला ते कागद एकमेकावर रचले जातात. शीट फेड यंत्रावर छपाईचा वेग कमी असतो. तसेच एका वेळी कागदाच्या एकाच बाजूला छपाई होऊ शकते.
शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा कागद किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. वर्तमानपत्राचा  कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो.

रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी यंत्र असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. जर्मनीत  तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.

रोटरी यंत्रात एका छपाई आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.

यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रिळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते.

No comments:

Post a Comment