Saturday, 25 April 2020

करोना’चा शिरकाव न झालेलं देशातील एकमेव राज्य, पर्यटकांना ऑक्टोबरपर्यंत ‘नो एंट्री’

🅾 करोना व्हायरसविरोधातील लढाईत सिक्किम सरकारने ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे करोना व्हायरसला अद्यापही सिक्किममध्ये शिरकाव करता आलेला नाही.

🅾सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य असं आहे जिथं अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सात लाख लोकसंख्या असलेल्या हिमालयातल्या छोट्या राज्यात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी ऑक्टोबरपर्यंत सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सिक्किम प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सिक्किमशिवाय नागालँडमध्येही सध्या एकही करोनाबाधित नाही. नागालँडमध्ये एकाला करोनाची लागण झाली होती. पण एकमेव रुग्ण असल्याने त्यालाही आसाममध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता नागालँडमध्येही करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आहे.

🅾सिक्किममध्ये करोनाचा फैलाव झाला नसल्याची माहिती देताना, देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते, असे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. “देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते. सिक्किमचे अनेक विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेतात. पण, ते सर्व जानेवारीमध्येच परतले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. करोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच त्यांना घरी परत पाठवलं.” 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...