🌿महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे विद्युतीकरण करण्यासाठी आशियायी विकास बँकेने भारत सरकारला 2616 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
🌿महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य असून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक अजूनही काम करतात.
🌿कृषी उत्पादनाला पाटबंधारे व वीज, पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागात उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रात नवीन वीज संजालातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.
🌿या कर्जातून 33/11 केव्हीची 121 उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असून 46,800 कि.मी.ची 11 किलोव्होल्टचे विस्तारित वीज संजाल सुरू करण्यात येणार आहे.
🌿महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची क्षमताही यात वाढवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार व ही कंपनी 703.1 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पातच 357.1 दशलक्ष डॉलर्सचा वाटा उचलणार आहे.
No comments:
Post a Comment