२५ एप्रिल २०२०

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता.

🌿केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

🌿पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीच्या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

🌿गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करून तो १७ वरून २१ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारला मिळणाऱ्या महसूलाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय लाबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती एनडीटीव्हीला सूत्रांकडून देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...