- सूर्यप्रकाश, उष्णता, आद्र्रता यामुळे करोनाचा विषाणू टिकाव धरू शकत नाही, असे मेरीलँड येथील बायोडिफेन्स अँड काउंटर मेजर यासंस्थने संशोधनाअंती म्हटले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील आरोग्यविषयक अधिकारी बिल ब्रायन दिली आहे.
- या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सूर्यप्रकाशात करोनाचा विषाणू टिकू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते अतिनील किरणही या विषाणूला मारू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता कमी आहे. भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने करोनाला अटकाव होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. पृष्ठभागावरचे व हवेतील विषाणू सूर्यप्रकाशात मारले जातात. तपमान व आद्र्रतेचाही यात संबंध असतो.
- वाढते तपमान व आद्र्रता या दोन्ही गोष्टी करोनाला मारक असतात.
या शोधनिबंधची शहानिशा अजून तटस्थ तज्ञांकडून झाली नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही.
ब्रायन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यात असे सांगितले गेले की, हा विषाणू २१ ते २४ अंश सेल्सियस किंवा त्यावरील तपमान व २० टक्के आद्र्रता असेल तर निम्मा होतो.
- थोडक्यात तो क्रियाशील राहत नाही. या तपमान व आद्र्रतेला तो दारांचे हँडल, पोलाद यावरही टिकत नाही. जेव्हा आद्र्रता ८० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल हा सहा तासांपर्यत खाली येतो म्हणजे तो सहा तासात निम्माच राहतो. हा विषाणू सूर्यप्रकाशात दोन मिनिटातच निष्क्रीय होतो. जेव्हा विषाणू हवेत असतो व तपमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर आद्र्रता २० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल एक तास असतो.
- सूर्यप्रकाशात हवेत असलेला विषाणू ३० सेकंदात निष्क्रिय होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार कमी होतो असे ब्रायन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ विषाणू नष्ट होतो म्हणजे सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असा घेण्यात येऊ नये.
- भारतात पावसाळ्यात दक्षतेची गरज
शिव नाडर विद्यापाठीच्या गणित विभागाचे सहायक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतात आता टाळेबंदी उठवल्यानंतर करोना विषाणूचा प्रसार रोखल्याचा आभास निर्माण होईल, त्याचा आलेखही स्थिर येईल, पण नंतर काही महिन्यांनी पुन्हा करोना पुन्हा सक्रिय होईल. आता काही आठवडे किंवा महिने करोना कमी झालेला दिसेल पण नंतर तो पुन्हा उसळी घेईल. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून ती काही काळ कमी दिसेल. आलेख स्थिर होइलही पण ती स्थिती फसवी असण्याचा धोका अधिक आहे.
- दुसऱ्या संसर्गाची लाट जुलै व ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते. बेंगळुरू येथील आयआयएससीचे प्राध्यापक राजेश सुदर्शन यांनी या मताशी सहमती दर्शवली.
No comments:
Post a Comment