Sunday, 19 April 2020

शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी नवे ‘किसान रथ’ मोबाइल अॅप

🔰 अन्नधान्य (तृणधान्य, भरडधान्ये, कडधान्ये इ.), फळे व भाजीपाला, तेलबिया, मसाले, तंतुमय पिके, फुले, बांबू, लवंग आणि किरकोळ वनोत्पादन, नारळ इत्यादी शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “किसान रथ” अॅप तयार केले आहे.

🔰विविध गोष्टींच्या वाहतुकीसाठी वाहतुकीचा योग्य पर्याय कोणता ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समजून घेता येते. या अ‍ॅपवर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी (शीतगृह सुविधेद्वारे) व्यापाऱ्यांना मदत होते.

🔰कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) तयार केलेल्या शेतकऱीस्नेही मोबाईल अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते केले गेले.

🔰शेतातून बाजारापर्यंत, शेतकरी उत्पादक संस्था संकलन केंद्रापर्यंत आणि गोदामापर्यंत शेतमालाची वाहतूक ही प्राथमिक वाहतुकीत समाविष्ट आहे. द्वितीय स्तरावरील वाहतुकीत बाजारातून शेतमालाची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यातील बाजारपेठेत, प्रक्रिया केंद्रात, रेल्वे स्थानकात, गोदामात आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे वाहतूक करणे अभिप्रेत आहे.

🔰बंदीच्या काळात शेतकरी आणि शेतीविषयक कामांची गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आणि अखंडीत व्यवसायासाठी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने पुढीलप्रमाणे विविध उपाययोजना केल्या आहेत,

🔰जलद गतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने 567 विशेष पार्सल गाड्या चालविण्यासाठी 65 मार्ग सुरू केले. या गाड्यांमधून देशभरात 20,653 टन माल वाहतूक झाली आहे.

🔰प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजनेच्या अंतर्गत 24 मार्च 2020 पासून सुरु झालेल्या संचारबंदीच्या कालावधीत आतापर्यंत सुमारे 8.78 कोटी शेतकरी कुटुंबांना 17,551 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सुमारे 88,234.56 मेट्रिक टन डाळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment