Saturday, 12 March 2022

मृत समुद्राला ‘मृत’ का म्हणतात?-


*मृत समुद्र काय आहे?*

मृत समुद्राला ‘खारट समुद्र’ असेही म्हणतात. मृत समुद्राच्या पूर्वेला जॉर्डन आणि पश्चिमेस इस्त्राईल व पॅलेस्टाईन हे देश आहेत. या समुद्र जगातील सर्वात कमी उंचीचे ठिकाण म्हणून देखील ओळखला जातो कारण या समुद्राचा पृष्ठभाग समुद्रसपाटी पासून ४३० मी.(१४१२ फुट) खाली आहे. या समुद्राची खोली ३०४ मी.(९९७ फुट) इतकी आहे. या पाण्याची क्षारता ३४२ ग्रॅम/कि.ग्रॅ. इतकी आहे जी आपली सर्वसाधारण समुद्रांपेक्षा जवळपास १०%(९.६) एवढी जास्त आहे. या समुद्राची लांबी ५० कि. मी. असून रुंदी १५ कि. मी. इतकीच आहे. जॉर्डन नदी या समुद्राला येऊन मिळते.

*मृत का?*

एवढ्या क्षारतेच्या पाण्यात कोणत्याही सजीव प्राण्याला जिवंत राहणे शक्य होणार नाही. म्हणून आजही या समुद्रात काही अपवादत्मक जीवजंतू सोडले तर एकही मासा किंवा सागरी प्राणी,  जलीय वृक्षे नाहीत. म्हणून या समुद्राला ‘मृत’ असे म्हणतात.

*इतका खारट कसा झाला?*

इतर समुद्रांच्या तुलनेत हा समुद्र १०% अधिक खारट आहे. पण हा इतका खारट का झाला असेल? तर हा समुद्र वर सांगितल्याप्रमाणे जगातील सर्वात खालची जागा म्हणून देखील ओळखले जाते. म्हणून यात जे पाणी नदीमार्फत किंवा पावसामार्फत येते ते एकदा या  समुद्रात आले की ते बाहेर जाऊ शकत नाही. उन्हात या पाण्याचे बाष्पीभवन होऊन यातील पाण्याची वाफ होऊन जाते पण क्षार आहे असेच राहते. हेच वर्षानुवर्षे घडत आले आहे. यातील पाणी बाहेर पडते व क्षार आहे असेच राहल्याने पाण्याची क्षारता अधिक वाढते. या पाण्याची क्षारता अधिक असल्याने या पाण्याची घनतादेखील आहे. या पाण्याची घनता १.२४ कि.ग्रॅ./ली. इतकी आहे. त्यामुळे या पाण्यात पोहणे हे तरंगण्याबरोबर आहे.

No comments:

Post a Comment