Monday, 27 April 2020

जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔶‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.

🔶पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

🔺जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन):+

🔶जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...