Tuesday, 28 April 2020

भारताची अर्थव्यवस्था


भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्याविनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७).क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे.जागतिक बॅंकभारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते.

◾️विनिमय दर◾️

१९४६ पर्यंत भारतामध्ये स्थिर विनिमय दराची पद्धत अस्तित्वात होती. ह्या काळात रुपयाचे मूल्य ब्रिटिश पाउंड स्टर्लिंगच्या मूल्याशी जोडलेले होते, स्वातंत्र्यानंतरही भारताच्या परकीय व्यापारापैकी ३०% व्यापार पाउंड स्टर्लिंगमध्ये होत असे. १९७५ नंतर स्थिर विनिमयाची पद्धत बंद होऊन भारताने बदलत्या विनिमय दरांचे अवलंबन केले. परंतु, तेव्हासुद्धा भारतीय रुपयाचे मूल्य विशिष्ट चलनांच्या समूहाच्या मूल्यावरून ठरवले जात असे, आणि रुपयाच्या मूल्याचे रिझर्व बॅंकेकडून कडक नियमन केले जात असे. १९९१ च्या आर्थिक सुधारांनंतर रुपयाचे मूल्य पूर्ण कन्व्हर्टिबल झाले, अर्थात रुपयाचे चलन दुसऱ्या चलनांमध्ये बदलायची सर्व बंधने हटविण्यात आली. इ.स. २००५ पासुन रुपयाचे मूल्य डॉलर, युरो आणि पाउंडच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...