🔰‘इबोला’ या घातक विषाणूला पायबंद घालण्यात 20 महिन्यांच्या मोहिमेनंतर अपयश आले असून काँगोमध्ये या विषाणूचा एक रुग्ण सापडला आहे.
🔰तर 52 दिवसांतच ‘इबोला’चा रुग्ण सापडल्याने या विषाणूचे निर्मूलन करण्यात अपयश आल्याचे मानले जाते.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, याचा अर्थ आता काँगोचे सरकार ‘इबोला’चे उच्चाटन झाल्याचे अपेक्षेप्रमाणे सोमवारी जाहीर करू शकणार नाही.
🔰1970च्या दशकात ‘इबोला’चा पहिला रुग्ण सापडला होता. ‘इबोला’मुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो.बेल्जियन वैज्ञानिकांनी काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमखी पडल्याचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्यात ‘इबोला’चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरून या विषाणूला ‘इबोला’ हे नाव देण्यात आले होते.
🔰तसेच हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात.
🔰माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. विषाणूचे झैरे, सुदान, बुंडीबुग्यो, रेस्टन व ताइ फॉरेस्ट असे प्रकार आहेत. ताप, स्नायूदुखी, उलटय़ा, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात.
No comments:
Post a Comment