✴️राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ. एम. एस. धर्मशक्तू यांना भारतीय नामांकन (वैयक्तिक) गटासाठी तर, लेप्रसी मिशन ट्रस्टला संस्था गटासाठी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान केले.
✴️यावेळी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, कुष्ठरोगाविरोधातील आपल्या लढ्यात इतक्या वर्षात आपण कुष्ठरोग निर्मुलनात यशस्वी झालो आहोत.
✴️वैज्ञानिक संशोधन संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे कुष्ठरोगाबाबत कलंक आणि पूर्वग्रह यात लक्षणीय घट झाली आहे. मात्र तरीही नवीन रुग्ण आढळत आहेत, असे ते म्हणाले.
✴️कुष्ठरोग नियंत्रणाची हिच पातळी कायम राखण्याचे आव्हान असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार सर्वांना सहज उपलब्ध होणे आणि एकात्मिक कुष्ठरोग सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय स्थितीपेक्षाही या आजाराशी जोडलेले सामाजिक कलंक अजूनही कायम असून, ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
✴️ या रोगाबाबत जागृक आणि शिक्षित व्हायला हवे आणि हिच जागृकता माहितीच्या प्रसाराद्वारे जनतेमध्ये निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment