Tuesday 14 April 2020

जालियनवाला बाग हत्याकांड

👉दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

👉इतिहास👈

👉सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.

👉 त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली.

👉दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.

👉हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

👉जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला.

👉या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...