Thursday, 2 April 2020

इतिहासप्रसिद्ध वक्तव्ये


🌺" वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी " - भारतमंत्री मोर्ले

🌺 'सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग' असे कॉंग्रेसचे वर्णन - लॉर्ड डफरीन

🌺"हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे" - भारतमंत्री बर्कनहेड

🌺स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे " लढाऊ हिंदू धर्म" असे वर्णन- भगिनी निवेदिता

🌺राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल 'मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' असीप्रशांश – बेंथम

🌺"मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते" - लॉर्ड क्लाइव्ह

🌺"प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे."अश्विनीकुमार दत्त.

🌺" भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ." असे कॉंग्रेसचेवर्णन - अश्विनीकुमार दत्त.

🌺" कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे" - अरविंद घोष

🌺" आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ" - लॉर्ड एल्गिन

🌺" टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे "- सुरेंद्रनाथ बनर्जी

🌺" बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजेआमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे." - सुरेंद्रनाथ बनर्जी

🌺" कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकूनघेतले पाहिजेत." – लाला लजपतराय

🌺‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

🌺' रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ' - लोकमान्य टिळक

🌺" आम्हाला न्याय हवा आहे भिक नको" - दादाभाई नौरोजी

🌺"बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तरफिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते."- आचार्य जावडेकर
  
🌺 "लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली" - डॉ. मुजुमदार

· 

🌺  " कोणत्याही परिणामांचा थोडाही
 विचार न केलेला करार म्हणजे लखनौ 
करार." - गारेट ब्रिटीशइतिहासकार.

🌺" अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत." - लॉर्ड मॉनटेग्यु

·
🌺क्रांतीकारकांना 'वाट चुकलेले तरुण' असे अनी बेझंट यांनी संबोधले.

🌺"गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीनेसांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनचपळ काढतात." - चित्तरंजन दास.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...