Wednesday, 8 April 2020

झांसीमध्ये ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारणार

उत्तरप्रदेशाच्या झांसी या शहरात ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारण्याची भारत सरकारची योजना आहे. सध्या विकसित करण्यात येत असलेल्या बुंदेलखंड प्रदेशात संरक्षण मार्गिका तयार केली जात आहे, त्यांच्याच एक भाग म्हणून ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ची उभारणी केली जाणार आहे.

🔸‘एरो अँड डिफेन्स पार्क’ याचा परिसर 6 हजार एकर पर्यंत पसरलेला असेल. प्रकल्पामध्ये अंदाजे 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

🔸हा प्रकल्प युक्रेनच्या कंपन्यांच्या सहकार्याने ‘टायटन एव्हिएशन अँड एरोस्पेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी विकसित करणार आहे.

🔸हा प्रकल्प चार टप्प्यात विकसित करण्याचे नियोजित आहे. तेथे एव्हिएशन यूनिवर्सिटी, एरोस्पेस लॅबोरेटरीज तसेच एअरबस, बोईंग, रशियन हेलिकॉप्टर अश्या वाहनांसाठी सिम्युलेटर सुविधा उभारली जाणार आहे. विमानांसाठी प्रगत देखरेख व दुरुस्ती केंद्र आणि ड्रोनची निर्मिती अश्या अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहे.

🔸याशिवाय धावपट्टी, निवासी वसाहत, विमानांसाठी सुट्या भागांसाठी उत्पादन केंद्र आणि विमानबांधणी केंद्र देखील असणार आहे.

No comments:

Post a Comment