Tuesday, 21 April 2020

न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.

▪️न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.

▪️तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.

▪️तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी  येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...