Thursday 30 April 2020

चिनी टेस्ट किट्सची ऑर्डर रद्द.

🔰रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठयाची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.

🔰करोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करुन निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔰तर खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आले होते. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🔰आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किटसचा वापर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. चिनी कंपन्यांकडून किट्स विकत घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील फॅक्ट शीटस सुद्धा मंत्रालयाने जारी केली आहे.

🔰तसेच काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सचे मूल्यमापन करण्यात आले. या किट्सच्या सहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला.

No comments:

Post a Comment