Tuesday, 28 April 2020

केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे.

🔰करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

🔰घर आणि कार्यालयांमध्ये AC च्या वापराबात केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी, असा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला आहे.

🔰इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडीशनर इंजिनिअर्सने (ISHRAE) सुचवलेली ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय सामाजिक बांधकाम विभागाने (CPWD) जारी केली आहेत.

🔰तर देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असेही यात सुचवण्यात आले आहे.

🔰याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, एसी सुरू नसेल तरीही घरात व्हेंटिलेशन आवश्यक आहे, असे एसी वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

🔰कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरसाठी एसीचा वापर करताना जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असावे असे देखील सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...