Thursday, 23 April 2020

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी.

🟣 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

🟣 केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली. 

🟣 देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे.

🟣 त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...