Monday, 6 April 2020

गोदावरी नदी

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते.

📌आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेशराज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे महत्त्व आहे.

📌सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरूनसाधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

📌गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

📌गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

🌸इतर नद्यांशी तुलना

📌एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदीप्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

🌸गोदावरी -उपनद्या आणि प्रकल्प🌸

✍ऊर्ध्व गोदावरी

दारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी [मुळा धरण] प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - म्हाळुंगी प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प

✍मध्य गोदावरी

कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी

✍विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे

📌मध्यप्रदेशातून येणारी
 वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

📌खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत.

📌नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प

✍कर्नाटकातून येणारी

📌कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.

✍ओरिसातून येणाऱ्या नद्या

📌इंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते.)

सिलेरु
शबरी नदी

✍आंध्रप्रदेशातून येणारी

तालिपेरू

🌸निसर्ग,शेती व आर्थिक

📌नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. @anilkoltempsc

📌नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.

📌गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.

📌गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्या मॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.

🌸गोदावरीवरील सिंचन प्रकल्प🌸

📌नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे. 

📌पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे, अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत. 

✍उपनद्यांवरील बंधारे

📌जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी. 

✍बंधारे, पूल, नौकानयन

📌डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. 

✍जलव्यवस्थापन

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे. 

📌नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते. 

📌गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.

📌आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...