३० एप्रिल २०२०

आधार अपडेट करणे होणार सोपे.

🔰यूआयडीएआयने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आधार अपडेशन करण्यासाठी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांतर्गत एका कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) परवानगी दिली आहे.

🔰तर सीएससीकडून 20 हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टष्ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

🔰तसेच आधार सेवा त्यांच्या निवासस्थानाजवळ आणण्यास यामुळे मदत होईल. सीएससीचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी यांनी सर्व बिझनेस करस्पाँडंट यांना सांगितले आहे की, त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण त्वरित पूर्ण करावे.न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर 2018 मध्ये सीएससीच्या माध्यमातून होणारे आधारचे काम बंद करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...