Thursday 23 April 2020

भारतीय रेल्वेविषयी मजेदार माहितीसंपादन करा.

🔥देशातील १४,३०० रेल्वे गाड्यांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.

🔥देशातील पहिली रेल्वे – मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी ६३,०२८ किमी.

🔥एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध) – १५.५ लाख दररोज १३० लाख प्रवासी आणि १३ लाख टन मालाची ने-आण; स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००

🔥जगातील सर्वात मोठा फलाट – खरगपूर – २७३३ फूट लांब. सोन नदी वरील नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल

🔥स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.

🔥चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. 

🔥चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने

🔥नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन – सिलिगुडी

🔥पहिला रेल्वे पूल – दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा – पारसिक बोगदा

🔥पहिला रेल्वे घाट रस्ता – थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे – कोलकाता मेट्रो

🔥पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली – नवी दिल्ली – १९८६ साली सुरुवात.

🔥पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.

🔥प्रसाधनगृहांची सुविधा – १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत

🔥स्थानकाचे सर्वात लहान नाव – IB (ओरिसा). – सर्वात मोठ्या नावाचे स्थानक – श्री वेंकट नरसिंह राजू वरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) (आंध्र प्रदेशात, तामिळनाडू राज्याच्या सरहद्दीवर)

🔥सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन – लखनौ – रोज ६४ गाड्या. सर्वात कमी लांबीचा मार्ग – नागपूर ते अजनी – ३ किमी

🔥दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे – केरळ एक्स्प्रेस – ४२.५ तासांत ३०५४ किमी.

🔥विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर – त्रिवेंद्रम राजधानी – ६.५ तासांत ५२८ किमी

🔥सर्वात लांब बोगदा – रत्नागिरीजवळ असलेला ६.५ किमीचा करबुडे बोगदा

🔥सर्वात जुने जतन केलेले इंजिन – फेरी क्वीन १८५५ – अद्याप वापरता येण्याजोगे.

🔥देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे – भोपाळ शताब्दी – ताशी १४० किमी.(आता तेजस आहे)

🔥सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे – हावडा – अमृतसर एक्स्प्रेस – ११५ थांबे

No comments:

Post a Comment