Thursday, 30 April 2020

अध्यक्षीय निवडणूक लांबणीवर टाकणार नाही - ट्रम्प.


✳️करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी तेथे अध्यक्षीय निवडणूक होत आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा विचार आपण करूच शकत नाही, तसे करण्याचे काही कारणही नाही.

✳️त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, ट्रम्प हे अमेरिकी निवडणुकीच्या तारखा बदलण्याच्या विचारात आहेत. ट्रम्प हे निवडणुकांच्या तारखा बदलणार आहेत, त्याची कारणे ते काहीही सांगतील, पण निवडणुका कशासाठी लांबणीवर टाकायच्या हे समजत नाही.

✳️ट्रम्प यांनी सांगितले की, झोपाळू बिडेनना कुणीतरी काहीही लिहून देते आणि प्रचाराच्या काळात ते काहीही बोलतात. त्याप्रमाणेच मी निवडणुका लांबणीवर टाकण्याची अटकळ त्यांनी बांधली आहे. पण निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार मी कधीही केलेला नाही.

No comments:

Post a Comment