Sunday, 19 April 2020

ट्वेन्टी-२० विश्वचषकाविषयी योग्य वेळी निर्णय घेऊ.

🔰करोनामुळे जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द अथवा लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या तरी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेऊ, अशी भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मांडली आहे.

🔰१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले असून ऑस्ट्रेलियानेही कडेकोट सीमासुरक्षा करताना अन्य देशांतील नागरिकांना त्यांच्या येथे प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक खेळवण्याचा अथवा बंदिस्त स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय ‘आयसीसी’ घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

🔰‘‘विश्वचषकासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सध्या तरी विश्वचषक पुढे ढकलण्याचा विचार आम्ही केलेला नाही. परंतु परिस्थिती पाहून योग्य वेळ आल्यास आम्ही नक्कीच विश्वचषकाविषयी निर्णय घेऊ. यासंबंधी सर्व संघांचे क्रिकेट मंडळ, गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...