Monday, 6 April 2020

कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती


📌हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

📌युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.

📌त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.

📌या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.

📌या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

✍कोरोनाला रोखण्याचे तंत्र

📌कोरोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे.

📌‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे.

📌एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख  एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे.

📌२००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...