Saturday, 18 April 2020

​ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली

🔷
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे.

- या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.

- या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.

- कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.

No comments:

Post a Comment