Saturday, 18 April 2020

गंगा:  मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक

🔷

- गंगा नदी ही मोठ्या नद्यांच्या श्रेणीमध्ये जगातल्या 10 सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक बनली आहे.

▪️  ठळक बाबी

-गेल्या पाच वर्षांमध्ये स्वच्छ गंगा अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे आणि ज्यामुळे गंगामधील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. त्यामुळे जलजीवनात वाढ झालेली आहे.

- पाच वर्षांपूर्वी केवळ दहापटच गंगेटीक डॉल्फिन पाहिल्या गेल्या होत्या, परंतू यावेळी 2 हजाराहून अधिक डॉल्फिन आढळल्या आहेत आणि इतरही जलचर जीवनात सुधारणा झाली आहे.

-  कचर्‍यामध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहिली गेली आहे.

- या उपक्रमामध्ये ‘सी-गंगा’ (सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज), IIT, NIT, NEERI या शैक्षणिक संस्थांची भूमिका उल्लेखनीय आहे. तसेच युरोपीय संघ, जर्मनी, डेन्मार्क, इस्त्राएल, जापान आणि कॅनडा या देशांचे सहकार्य देखील लाभले.

- जगात उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी केवळ 4 टक्के पाणी भारताकडे आहे तर जगातली 18 टक्के लोकसंख्या आणि समतुल्य पशुधन भारतात आहे. सर्वाधिक धरणे असलेल्या देशांमध्ये आज भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

▪️  भारत सरकारचा पुढाकार

- भारत सरकारच्या पुढाकाराने 2016 साली राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या अंतर्गत सांडपाणी, कचर्‍याची विल्हेवाट याच्यासंबंधित जवळपास 305 प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यालाच जलशक्ती अभियानाची जोड मिळाली.

-  भारत सरकारने गंगा नदीच्या उगमापासून ते उन्नाव (उत्तरप्रदेश) पर्यंत किमान पर्यावरण-विषयक प्रवाह राखण्यासाठी अधिसूचित केले आहे.

▪️ गंगा नदी

- गंगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे.

-  गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो.

- तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

No comments:

Post a Comment