Saturday, 25 April 2020

“तियानवेन 1”: चीनची पहिली मंगळ मोहीम

- चीन देशाने मंगळावर मानवरहित उपग्रह पाठविण्याची योजना तयार केली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्षात येणाऱ्या चीनच्या मंगळ मोहिमेचे नाव 'तियानवेन 1' असे आहे. 'चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

- चीनचे प्रसिद्ध कवी क्व युआन यांच्या कवितेवरून 'तियानवेन' असे नाव देण्यात आले आहे. 'स्वर्गाला विचारलेले प्रश्न' असा तियानवेन या चीनी शब्दाचा अर्थ आहे. मंगळ मोहिमेची आखणी करताना या कवितेच्या संदर्भाने मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

- भारत, अमेरिका, रशिया आदी देशांनंतर आता चीनची मंगळ मोहीम चालवली जाणार आहे.

- चीनने आपला पहिला उपग्रह 'डाँग फेंग हों-1' अवकाशात पाठवला त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही घोषणा करण्यात आली आहे. हा दिवस चीनकडून 'अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जातो.

▪️ ग्रह

- मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ‘तांबडा ग्रह’ असे सुद्धा म्हटले जाते. आयर्न ऑक्साइडमुळे ग्रहाला तांबडा रंग मिळाला आहे.

- हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे.

-  सूर्यमालेतला आतापर्यंतचा सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स (उंची: 26.4 किलोमीटर) तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळ ग्रहावर आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.

- मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 23 कोटी किमी (1.5 खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे 687 दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस 24 तास, 39 मिनिटे व 35.244 सेकंद इतका भरतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...