Friday, 3 April 2020

छत्तीसगढ सरकारचा मोठा निर्णय; आता 1⃣ 4⃣ नाही तर 2⃣ 8⃣ दिवसांचं होम आयसोलेशन.

🔰करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सर्व राज्य सरकारदेखील आपापल्या पातळीवर योग्य ती पावलं उचलत आहेत.

🔰यादरम्यान करोनाच्या संशयित रूग्णांबाबत छत्तीसगढ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाच्या संशयितांना १४ नाही तर २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

🔰दरम्यान, सुकमा जिल्ह्यात तेलंगणहून आलेल्या अनेक गावकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी १०० बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत.

🔰या ठिकाणी करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं आहे, शेजारी राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

🔰तर दुसरीकडे आता छत्तीसगढ सरकारच्या निर्देशाप्रमाणे करोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगण सरकारनंही करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

🔰निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

No comments:

Post a Comment