✍सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. पण चीनने UNSC मध्ये आपल्या विशेषधिकाराचा वापर करुन करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
✍इस्तोनिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य आहे. मागच्या आठवडयात त्यांनी करोना व्हायरसवर चर्चेची मागणी केली होती. करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे इस्तोनियाने म्हटले होते. इस्तोनियाने आपल्या प्रस्तावात करोना व्हायरससंबंधी सर्व माहिती पारदर्शकतेने मांडावी अशी मागणी केली होती. पण चीन त्यासाठी तयार नव्हता असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
✍करोना व्हायरस या आजाराचे मूळ चीनमध्ये आहे. चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. तिथूनच संपूर्ण जगभरात या आजाराचा फैलाव झाला. करोना व्हायरससंबंधीची माहिती लपवल्याचा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच माहिती दिली असती तर या व्हायरसचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर रोखणे शक्य झाले असते असे तज्ञांचे मत आहे.
No comments:
Post a Comment