आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) आदिवासी लोकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरिता “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम चलविलेला आहे.
प्रधानमंत्री वनधन योजनेच्या (PMVDY) अंतर्गत नोंदणीकृत आदिवासी वन उपज उत्पादकांमध्ये उद्योजकतेचे कौशल्य निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.
ठळक बाबी
🔸सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने या उपक्रमास पाठिंबा दर्शविला आहे.
🔸लोकांना 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम सहा आठवडे चालणार असून त्यादरम्यान एकूण 12 सत्र घेतले जाणार आहे.
🔸TRIFED यांच्या वतीने 1200 वन धन विकास केंद्रांची उभारणी केली जात असून या योजनेत 28 राज्यांतून 3.6 लक्ष आदिवासी वन उत्पादकांची नोंदणी झालेली आहे. एका केंद्रामध्ये प्रत्येकी 20 लोकांसह 15 बचत गटांचा सहभाग असणार.
🔸या उपक्रमाच्या काही भागीदारांमध्ये IIM रांची, दीनदयाळ संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, IIT कानपूर आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री वन धन योजना 2018 या वर्षापासून 27 राज्यांमध्ये चालवली जात आहे.
आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली.
No comments:
Post a Comment