Friday, 13 March 2020

RaIDer-X”: DRDO आणि IISc बंगळुरू यांनी तयार केलेले नवे स्फोटक शोधन यंत्र

◾️पुणे (महाराष्ट्र) या शहरात झालेल्या राष्ट्रीय स्फोटक शोधन कार्यशाळेत “RaIDer-X” नावाचे एक नवीन स्फोटक शोधन यंत्र सादर करण्यात आले. हे यंत्र दूर अंतरावरून देखील स्फोटके शोधू शकते.

◾️शुद्ध स्वरुपातली तसेच मिश्रण असलेली रसायने वापरून बनवलेल्या स्फोटकांबद्दल या यंत्राच्या माहितीकोषात माहिती भरल्यास तशी अनेक प्रकारची स्फोटके हे यंत्र शोधू शकते. आवरणाखाली असलेली स्फोटके शोधण्यातही हे यंत्र सक्षम आहे.

◾️पुण्याची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांची उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा आणि बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे हे यंत्र विकसित केले आहे.

🔰संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)..

◾️या संस्थेची स्थापना 1958 साली झाली. पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करते. उड्डयण शास्त्र, अग्निबाण व क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहन, अभियांत्रीकी यंत्रणा इत्यादी क्षेत्रात काम करते. संस्थेमध्ये 52 प्रगत प्रयोगशाळा आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment