Monday, 9 March 2020

MPSC -आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा......

👉आपल्या सभोवती असे खूप लोक असतील जे 4 /5 वर्ष अभ्यास करतात पण अजून त्यांना post निघालेली नसते पण अभ्यास करत आहेत आणि  बाकीचे असतात जे नवीनच mpsc करण्यासाठी आलेले असतात ते त्यांच्याकडे बघून स्वतःला समजवतात की माझ्या जवळ पण अजून 5 वर्ष आहेत....आणि येथेच ते चुकतात..

👉एकदा माणूस comfart zone मध्ये गेला की त्याला बाहेर यायला खूप वेळ लागतो कारण त्याला तो zone खूप आवडतं असतो कारण तिथे त्याला छान वाटत असते...एवढंच आपलं जग आहे असं समजून तो वावरत असतो..त्यामुळे पहिला आपला comfart zone सोडून द्या.....

👉जे 5 /6 वर्ष अभ्यास करतात त्यांनी त्या नवीन लोकांना आपण काय चूका केल्या,ज्या त्या नवीन लोकांनी  करू नये यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे...(काही तरी चुकलेच असेल ना ज्यामुळे 5 /6 वर्ष mpsc करण्यात घालवली?).

👉मार्गदर्शन-mpsc मार्गदर्शन शिवाय अजिबात करता येत नाही,स्वतः करतो म्हंटल तर 1/2 वर्ष  जाते समजायला की mpsc काय आहे??त्यामुळे प्रत्येकास स्वतःचा एक तरी गुरू असावा जो योग्य मार्गदर्शन देईल.नसेल तर चांगला गुरू शोधा.. आज -आता.

👉वेळ- mpsc ला छळणारी सगळ्यात वाईट गोष्ट. येथे वेळ कोणाला पुरतच नाही,किती केला अभ्यास तरी वेळ कमीच पडतो.त्यामुळे वेळेचं बंधन असणे खूप गरजेचं आहे.ज्याला वेळेला जिंकता आलं त्यानं सगळं जिंकलं..

👉ध्येय - मी आता  कोण आहे? मला काय करायचं आहे? मी करू शकेल का?? या प्रश्नांची उत्तरे शोधा मगच अभ्यासला सुरवात करा.जायचं कुठे हेच माहीत नसेल तर कधीच रस्ता सापडणार नाही..असेच भटकत जाणार जिथं कधीं जायचंच नव्हतं...

👉नियोजन- mpsc फिरते नियोजना भोवती,जर नियोजन नसेल तर कोणतीच गोस्ट करता येणार नाही.1 वर्ष/1 महिना/1 आठवडा/1 दिवस या सगळ्यांच नियोजन असंन गरजेचं आहे.सगळेच पाळलं जाईल असा नाही पण ज्यावेळी हे सगळे व्यवस्थित तुमच्या आयुष्यात घडत असेल त्यावेळी तुमचा असलेला हुरूप/आनंद एका वेगळ्याच point ला असेल..

👉स्वतः ला वेळ-   खूप गरजेची गोष्ट...
आठवड्यात एक दिवस संध्याकाळी किमान 2 तास .mobile /tv/family/frnds सगळ्या पासून दूर जाऊन आत्मपरीक्षण करणे गरजेच आहे.काय चुकते ??हा प्रश्न विचारला आणि प्रामाणिक उत्तरे दिली आणि त्यावर उपाय निघाला  तर तुमच्या एवढा आनंदी व्यक्ती कोणीच नसेल..(,नरेंद मोदीजी meditation करततात,एवढा मोठा व्यक्ती स्वतःला एवढ्या व्यापातुन वेळ देत असेल ...तर आपण का नाही?

👉प्रेम- नक्की करा,GF वरच केलं पाहिजे असं नाहीये.जी व्यक्ती तुम्हाला आनंदित पाहण्यासाठी खूप प्रयत्न करत असते त्या व्यक्तीवर करा..सगळ्यांना वेळ द्या पण मर्यादेत.... दुःख सांगून येत नसतात पण स्वतः च्या कृती मुळे दुःख येईल असं काय करू नका...

👉आत्मविश्वास-सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ,जास्त असून पण चालत नाही ,नसून पण चालत नाही... पण पाहिजे नक्की..या गोष्टीमुळे अशक्य गोष्टी सहज होऊ शकतात..confident रहा...

👉जीवन-आयुष्य सुंदर आहे,व्यर्थ नका घालवू .ज्या त्या वयात त्या गोष्टी करा..प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या..मजेत राहा-शांत रहा-आनंदित रहा...यश तुमचंच आहे..

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...