Thursday, 5 March 2020

General Knowledge

▪ ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कोलकाता

▪ भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
उत्तर : अर्मेनिया

▪ कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
उत्तर : 4 दशलक्ष डॉलर

▪ कोणत्या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ 29 फेब्रुवारी 2020 रोजी ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक कुठे पार पडली?
उत्तर : तामिळनाडू

▪ 'डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो?
उत्तर : राजकारण

▪ सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली.
उत्तर : गुजरात

▪ कोणत्या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 1 मार्च

▪ ‘एकम महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ ‘अतुल्य भारत’च्या संकेतस्थळावर कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलं आहे?
उत्तर : चिनी, अरबी, स्पॅनिश

▪ भारतातल्या कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेत?
उत्तर : बंगळुरू

▪ भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात कोणाकडून ‘1000 स्प्रिंग्ज’ पुढाकारांची घोषणा करण्यात आली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪ “EASE 3.0” धोरण कशाशी संबंधित आहे?
उत्तर : बँकिंग क्षेत्रात सुधारणा

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय MSME पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ पूर्व क्षेत्र परिषदेची 24वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भुवनेश्वर

▪ राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र कोणत्या शहरात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪ ‘किनारपट्टी आपत्ती निवारण व स्थितिस्थापकत्व विषयक परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणत्या मंत्रालयाने “मार्केट इंटेलिजेंस अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम” (MIEWS) सादर केली?
उत्तर : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

▪ ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर : 77 वा

▪ भारतीय विधी आयोग हे कोणते मंडळ आहे?
उत्तर : अवैधानिक मंडळ

▪ कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?'
उत्तर : कॅप्टन अमरिंदर सिंग

▪ ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार?
उत्तर : चंदीगड

▪ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले?
उत्तर : सिक्किम

▪ कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर : डॉ. नीती कुमार

▪ पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत?
उत्तर : कर्नाटक आणि तामिळनाडू

▪ सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते होते?
उत्तर : तामिळनाडू (मद्रास)

▪ शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला?
उत्तर : मेघालय

▪ 34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर : डी. गुकेश

▪ ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ कोणाकडून सादर करण्यात आले?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक

No comments:

Post a Comment