Friday, 13 March 2020

लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
-----------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
--------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले. माहिती संकलन वैभव शिवडे
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
-------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
--------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- माहिती संकलन वैभव शिवडे
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-----------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment