📚रेपो व्यवहार
RBI कडून 1992 पासून या दराचा
उपयोग केला जात आहे.
रेपोचा अर्थ
Repurchase Obligation (पुनर्खरेदी बंधन)
📌रेपो दर म्हणजे व्यापारी बैँका त्यांच्याकडील रोख रकमेतील राखीव निधी अल्पकाळासाठी ज्या व्याजदराने RBI कडे ठेवतात, तो व्याज दर होय.
📌 रेपो व्यवहारांतर्गत RBI व्यापारी बैँकांकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देतात, ही कर्जे सध्या
एक दिवसाची कर्जे असतात, म्हणजेच दुसऱ्या दिवशी बँका रोख्यांची पुनर्खरेदी करून RBI ला कर्ज परत करतात.
📌 रेपो व्यवहारांमुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढून बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढते.
📌 चलनवाढीच्या परिस्थितीत RBI रेपो दर वाढवतात . त्यामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता होऊन बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता घटते.
📌याउलट चलन घटीच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँक रेपो दर कमी करून कर्ज स्वस्त बनवतात. त्यामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते व बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढते.
No comments:
Post a Comment