Monday, 16 March 2020

Current Affairs - 17/03/2020

1)ARCI-इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स या संस्थेनी कोणते नवे तंत्रज्ञान विकसित केले?
(A) थर्मल एनर्जी ट्यूब तंत्रज्ञान
(B) हायड्रोइलेक्ट्रिसिटी ट्यूब तंत्रज्ञान
(C) सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान.  √
(D) सोलार थर्मल ट्यूब तंत्रज्ञान

2)कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी इराणने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आर्थिक मदत मागितली?
(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.  √
(B) संयुक्त राष्ट्रसंघ
(C) जागतिक आरोग्य संघटना
(D) अॅम्नेस्टी इंटरनॅशनल

3)भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सिंध आणि कच्छच्या सीमेचा वाद कोणत्या रूपात ओळखला जातो?
(A) काश्मीर तंटा
(B) शिमला तंटा
(C) नियंत्रण रेषा तंटा
(D) सर क्रीक खाडी तंटा.  √

4)मणीपूर, जम्मू व कश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांसाठी कोणते आयोग स्थापन करण्यात आले?
(A) प्राथमिक आयोग
(B) सीमांकन आयोग.  √
(C) वित्तीय आयोग
(D) वैद्यकीय आयोग

5)अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स या संस्थेनी नैसर्गिक संकटांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित केले?
(A) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स.  √
(B) पॉलिमर इलेक्ट्रॉनिक मायक्रोऑर्गनिझम फ्युल सेल्स
(C) हायड्रोइलेक्ट्रिक इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(D) दिलेले सर्व

6)कोणत्या उद्देशाने फेसबुक इंडिया कंपनी “प्रगती” नावाचा उपक्रम राबवित आहे?
(A) बालमजुर निर्मूलन
(B) स्त्री भ्रूणहत्या निर्मूलन
(C) भारतात महिलांमध्ये उद्योजकता वाढवणे.  √
(D) पायाभूत सुविधांचा विकास वाढवणे

7)फेब्रुवारी 2020 महिन्यात वनस्पती तेलाच्या आयातीमध्ये 10.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,

1. 15.32 लक्ष टन इतक्या वनस्पती तेलाची आयात झाली.

2. गेल्या महिन्यात वनस्पती तेलाच्या झालेल्या आयातीपैकी 10,89,661 टन खाद्यतेल होते.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1) बरोबर आहे
(B) केवळ (2) बरोबर आहे
(C) दोन्ही बरोबर आहेत
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे.  √

8)13 मार्च 2020 रोजी कोणत्या काश्मिरी राजकारणीवरील प्रतिबंध रद्द करण्यात आले?
(A) फारुख अब्दुल्ला.  √
(B) अली मोहम्मद सागर
(C) सज्जाद लोण
(D) ओमर अब्दुल्ला

9)भारत सरकारने चार राज्यांमधल्या राष्ट्रीय महामार्गाचा 780 किलोमीटर लांबीचा पट्टा दुरुस्त करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,

1. महामार्गाच्या दुरूस्तीचा खर्च सुमारे 7,660 कोटी रुपये इतका आहे.

2. प्रकल्पाच्या गुंतवणूकीमध्ये जागतिक बँकेकडून 5000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

अचूक पर्याय निवडा.

(A) दोन्ही बरोबर आहेत
(B) केवळ (1) बरोबर आहे.  √
(C) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे
(D) केवळ (2) बरोबर आहे

10)9 मार्च 2020 रोजी तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी खाली आल्या?
(A) 30 टक्के
(B) 20 टक्के.  √
(C) 50 टक्के
(D) 10 टक्के

1 comment:

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...