🔰 करोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये ३१ मार्चपर्यंत संपूर्ण 'लॉकडाऊन' पाळण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिलं राज्य राजस्थान हे पहिलं राज्य ठरलंय.
🔰 या लॉकडाऊन दरम्यान, भाज्या, दूध यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसोबत मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. याशिवाय कोणतेही दुकान सुरू राहणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी काही राज्यांनी काही शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. परंतु, राजस्थानमध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू राहणार आहे.
No comments:
Post a Comment