Sunday, 29 March 2020

तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

📍महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली आहे.

📍कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दहा रुपयात मिळणारी थाळी 5 रुपयात मिळणार आहे.

📍महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.

*⏰शिवभेजन मिळण्याची वेळ*

✅रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

♻️ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे.

🍽️ रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असं भुजबळ म्हणाले.
🍽️ पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे.
🍽️ कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.

*📣महत्वाचे*

💠या दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल.

💠केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत.

💠त्यांनी सांगितलं की, स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महीने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...