Tuesday, 10 March 2020

भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाची सरकारकडून घोषणा

🔰 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल)मधील 52.98 टक्के सरकारी भांडवल विकण्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागवून तिचे खासगीकरण करण्याचा इरादा केंद्र सरकारने जाहीर केला.

🔰मात्र आसाममधील नुमलीगढ तेलशुद्दिकरण कारखाना चालविण्यासाठी स्थापलेल्या स्वतंत्र कंपनीतील ‘बीपीसीएल’चे 61.65 टक्के भांडवल विकले जाणार नाही.

🚦निविदेसाठीच्या अटी

🔰 सार्वजनिक क्षेत्रातील कोणताही कंपनी निविदा भरण्यास अपात्र.

🔰 10 अब्ज अमेरिकी डॉलर मूल्य असलेली खासगी कंपनीच पात्र.

🔰 जास्तीत जास्त चार खासगी कंपन्या एकत्रितपणे निविदा भरू शकतील.

🔰 त्यापैकी मुख्य कंपनीचा त्यात किमान ४० टक्के वाटा असायला हवा.

🔰 सुरुवातीच्या चार महिन्यांत एकत्रित निविदाकारांपैकी सहभागी कंपन्या बदलता येतील. मात्र मुख्य कंपनी तीच कायम ठेवावी लागेल.

🔰 ही निविदा प्रक्रिया दोन टप्प्यांची असेल.

🔰 पहिल्या टप्प्यात स्वारस्य व्यक्त केले जाईल.

🔰 दुसऱ्या टप्प्यात स्वारस्यदारांना स्पर्धात्मक बोली सादर करावी लागेल.

🔴 मालमत्तेचे स्वरूप

🔰 बहुसंख्य भांडवलासह बीपीसीएलचे संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रण.

🔰 मुंबई, कोची, बिना व नुमलीगढ येथील तेलशुद्धीकरण कारखाने. त्यांची क्षमता वर्षाला 249 दशलक्ष टन. देशाच्या एकूण क्षमतेच्या 15 टक्के.

🔰 देशभरातील 15,177 पेट्रोल पंप, 6.011 एलपीजी वितरक एजन्सी व 51 एलपीजीच्या टाक्या भरण्याचे कारखाने.

🔰 देशाच्या इंधन बाजारपेठेतील 21 टक्के हिस्सा व विमानांमध्ये इंधन बरण्याची 51हून अधिक केंद्रे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...