Wednesday 8 December 2021

मराठी व्याकरण :- संधी

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

🟤 संधीचे प्रकार 🟤

१. स्वरसंधी:–

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. स्वरसंधीचे स्वरूप स्वर  स्वर असे असते.

उदाहरणार्थ:-

कवि + ईश्वर = कवीश्वर (इ + ई = ई)

🟤 २. व्यंजनसंधी: –🟤

जवळजवळ येणा-या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

 उदाहरणार्थ:- 

१. सत + जन = सज्जन

  (त + ज) (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)  

२. चित  + आनंद = चिदानंद

  (त + आ) (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

🟤३. विसर्गसंधी: –🟤

एकत्र येणा-या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेंव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग  व्यंजन किंवा विसर्ग  स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदाहरणार्थ : - 

१. तप: + धन = तपोधन (विसर्ग  +ध)   

२. दुः + आत्मा = दुरात्मा (विसर्ग + आ)

🟤सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी -🟤

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

१. सूर्य + अस्त = सूर्यास्त

२. कट + अक्ष = कटाक्ष

३. रूप + अंतर = रुपांतर

४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

५. स + अभिनय = साभिनय

६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

७. सह + अध्यायी = सहाध्यायी

८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

९. सह + अनुभूती = सहानुभूती

१०. मंद + अंध = मंदांध

११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

🟤 अ + आ = आ 🟤

१. देव + आलय = देवालय

२. हिम + आलय = हिमालय

३. फल + आहार = फलाहार

४. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

५. गोल + आकार = गोलाकार

६. मंत्र + आलय = मंत्रालय

७. शिशिर + आगमन = शिशिरागमन

८. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

९. धन + आदेश = धनादेश

१०. जन + आदेश = जनादेश

११. दुख: + आर्त = दुखार्त

१२. नील + आकाश = नीलाकाश

१३. कार्य + आरंभ = कार्यारंभ

🟤 आ +आ = आ 🟤

१. महिला + आश्रम = महिलाश्रम 

२. राजा + आश्रय = राजाश्रय

३. कला + आनंद = कलानंद

४. विद्या + आलय = विद्यालय

५. राजा + आज्ञा = राजाज्ञा

६. चिंता + आतुर = चिंतातुर

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

🟤 इ+ इ = ई 🟤

१. मुनी + इच्छा = मुनीच्छा

२. कवि + इच्छा = कवीच्छा

३. अभि + इष्ट = अभीष्ट

🟤 इ+ ई = ई 🟤

१. गिरि + ईश = गिरीश

२. कवि + ईश्वर = कवीश्वर

३. परि + ईक्षा = परीक्षा

🟤 ई+ इ = ई 🟤

१. गोमती + इच्छा = गोमतीच्छा

२. रवी + इंद्र = रवींद्र

३. मही+  इंद्र = महिंद्र

🟤 ई+ ई = ई 🟤

१. मही + ईश = महीश

२. पार्वती + ईश = पार्वती

🟤 उ +उ = ऊ 🟤

१. गुरु + उपदेश = गुरुपदेश

२. भानु + उदय = भानुदय

🟤 ऊ +उ = ऊ 🟤

१. भू + उद्धार = भूद्धार

२. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष

३. लघू + उत्तरी = लघूत्तरी

ऋ+ ऋ = ऋ

१. मातृ + ऋण = मातृण

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...