▪️अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात.
▪️ याउलट किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे समजतात.
▪️चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता.
▪️परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य चलनवाढ’ होय.
💢 चलनवाढ 💢
▪️महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय.
◾️चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' आणि 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले जातात .
◾️मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.
◾️चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.
💢 भारतातली चलनवाढीची कारणे 💢
●तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे.
●ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो.
●परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.
●ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.
●परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.
●काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.
● या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.
No comments:
Post a Comment