👉 पहिली घटनादुरुस्ती - भारतीय राज्यघटनेत 1951 मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने राज्यघटनेत 31-अ आणि 31-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.
👉 7 वी घटनादुरुस्ती - भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी 1956 मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली.
👉 17 वी घटनादुरुस्ती - 1964 मध्ये झालेली ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम 31 मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे.
👉 42 वी घटनादुरुस्ती - 1976 साली झालेली ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झाली. यामध्ये राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने समाविष्ट केले गेले.
👉 44 वी घटनादुरुस्ती - 1978 मध्ये झालेल्या या दुरुस्तीमध्ये 42 व्या घटनादुरुस्ती मधील वादग्रस्त भाग दूर करणे हा उद्देश होता.
👉 52 वी घटनादुरुस्ती - पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने घालण्याच्या दृष्टीने 1985 साली ही घटनादुरुस्ती केली.
👉 61 वी घटनादुरुस्ती - 1989 साली झालेल्या या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या 326 व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली.
👉 73 वी घटनादुरुस्ती - पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचे काम 1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत करण्यात आले.
👉 86 वी घटनादुरुस्ती - 2002 मधील या घटनादुरुस्तीने घटनेच्या 21 व्या कलमात 21-अ हे नवे कलम जोडण्यात आले.
👉 92 वी घटनादुरुस्ती - 2003 मधील या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात बदल करण्यात आला.
👉 93 वी घटनादुरुस्ती - 2006 मधील या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली.
No comments:
Post a Comment