Sunday, 8 March 2020

कोरोनावर रामबाण औषध सापडले; 'जन्मदात्या' चीनचाच दावा

🔴ठळक मुद्दे

📌 इटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते.
📌 आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे.
📌 यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे

📌 चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे. तर या जिवघेण्या व्हायरसचे उगमस्थान असलेल्या चीननेच रामबाण औषध शोधल्याचा दावा केला आहे. लवकरच या औषधाचे वितरण करण्यात येणार असल्याचेही चीनने म्हटले आहे.

📌 कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास 50 हून अधिक देश त्रस्त झाले आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण आढळू लागले आहेत. इटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते. यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, चीनने त्रस्त झालेल्या जगाला आनंदाची बातमी दिली आहे.

📌 चीनने कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा केला आहे. हे औषध चीनी सैन्याच्या त्याच मेजर जनरलच्या टीमने शोधले आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी सार्स आणि इबोलासारख्या खतरनाक व्हायरसवर औषध शोधले होते. या औषधाच्या शोधामुळे त्याने जगाला मोठ्या संकटापासून वाचविले होते. आता पुन्हा असा चमत्कार होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

📌 गेल्या महिन्याभरापासून चीनी सैन्याची एक वैद्यकीय टीम कोरोना व्हायरसवर लस शोधण्याच्या कामी लागली होती. पिपल्स लिबरेशन आर्मीचे वैद्यकीय तज्ज्ञ शेन वेई यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यातय येत होते. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने याचे वृत्त दिले आहे. वेई यांच्या टीमने कोरोनावर लस शोधण्यात यश मिळविले आहे.

▪️याच संशोधकाने जगाला दोनदा वाचविले

📌53 वर्षांच्या वेई यांनी सांगितले की, त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत होती. याच टीमने 2002 मध्ये सार्स आणि 2014 मध्ये इबोला सारख्या भयंकर व्हायरसवर लस शोधली होती. त्यांच्या टीमने मिलिट्री मेडिकल सायन्स अकादमीसोबत मिळून हा शोध लावला आहे.
या अकादमीमध्ये 26 तज्ज्ञ, 50 हून अधिक वैज्ञानिक आणि 500 हून जास्त अनुभवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. ही लस लवकरच उपचारासाठी उपलब्ध करण्याचा दावा चीनने केला आहे.

No comments:

Post a Comment