गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.
वर्णनसंपादन करा
झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).
कारण आणि लक्षणेसंपादन करा
पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.
No comments:
Post a Comment