🔰भारताचे माजी हाॅकीपटू बलबीर सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते.
🔰हाॅकी इंडियाने ट्विट करताना माजी हाॅकीपटू आणि दोनवेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या बलबीर सिंह खुल्लर यांच्या निधनाबदल दु:ख व्यक्त केले असून त्यांनी श्रध्दाजंली वाहिली आहे.
🔰पंजाबमधील जालंधर जिल्हातील संसारपूर गावात जन्म झालेल्या बलबीर यांनी १९६३ साली फ्रान्सच्या लियोनमध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.
🔰आपल्या कारकिर्दीत त्यांनी बेल्जियम, इंग्लंड, नेदरलॅण्ड आणि पश्चिम जर्मनी अशा देशाचा दौरा करताना भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.
🔰बलवीर १९६६ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि १९६८ मध्ये मैक्सिकोमध्ये झालेल्या आॅलिम्प्कमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.
No comments:
Post a Comment