Monday, 23 March 2020

राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना निमलष्करी दलाच्या परीक्षेत जादा गुण दिले जाणार

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेत (NCC) देशातल्या अधिकाधिक युवांनी सहभागी व्हावे या हेतूने केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) घेण्यात येणाऱ्या थेट भरती परीक्षेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना जादा (बोनस) गुण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

🔴ठळक बाबी

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेचे “अ” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 टक्के जादा गुण, ”ब” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 टक्के जादा गुण तर “क” प्रमाणपत्र धारकांना 5 टक्के जादा गुण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

🔰 उपनिरीक्षक आणि हवालदार पदांसाठी आगामी भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

🔰 सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या संबधित पोलीस दलांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अशाच प्रकारच्या प्रोत्साहक योजना राबवाव्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

🔰 सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती होण्यासाठी उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुण अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार.

🔰 राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या युवांना शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.

🔰 NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

🔰 दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते.

No comments:

Post a Comment