Friday, 13 March 2020

आयआयटी बॉम्बे देशात अव्वल


🌅 क्यूएस वर्ल्ड रँकिंगच्या विषयनिहाय श्रेणीमध्ये मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

🌅 तर त्यानंतर हा मान आयआयटी दिल्ली आणि आयआयटी खरगपूर यांना मिळाला आहे.

🌅 2020 सालची द क्यूएस वर्ल्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच जाहीरकरण्यात आली.

🌅 यामध्ये 2019 वर्षीच्या आपल्या कामगिरीत सुधारणा करत आयआयटी बॉम्बेने जागतिक क्रमवारीत 53 वरून 44 व्या स्थानावर झेपघेतली आहे.

🌅 तसेच जागतिक क्रमवारीत विषयनिहाय श्रेणीमध्ये पहिल्या 50 मध्ये स्थान मिळविण्यात केवळ आयआयटी बॉम्बे (44) आणि आयआयटी दिल्ली (47) या शैक्षणिक संस्था यशस्वी होऊ शकल्या आहेत.

🌅 क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंग ही अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे. ग्लोबली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने आपले स्थान पहिल्या क्रमांकावर टिकवून आहे.

🌅 तर क्यूएसच्या या यादीत 85 देशांमधील जगातील अव्वल 1 हजार इन्स्टिट्यूट आहेत. आयआयटी बॉम्बेचा एकूण स्कोर 100 पैकी 49.5 इतका आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...