Monday, 30 March 2020

आजचे प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला उत्कृष्टतेसाठी मुप्पावरपू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?
(A) अभिजित विनायक बॅनर्जी
(B) एम. एस. स्वामीनाथन.   √
(C) कैलास सत्यार्थी
(D) सोनम वांगचुक

2)_______ येथे ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली.   √
(C) कोलकाता
(D) हैदराबाद

3)भारत सरकारच्यावतीने इंधन बचतीविषयीची कोणती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे?
(A) सक्षम.   √
(B) संचय
(C) अमुल्य
(D) उज्ज्वल

4)ताज्या ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2020’ याच्या संदर्भातली विधाने विचारात घ्या.

I. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

II. पहिले पाच जागतिक धोके हे पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित आहेत ज्यांचा परिणाम यावर्षी जगावर होण्याची शक्यता आहे.

III. बोर्जे ब्रेंडे हे UNDPचे  अध्यक्ष आहेत.

वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

(A) I आणि II
(B) I आणि III   √
(C) केवळ III
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

5)कोणती व्यक्ती यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी पुरुषांच्या पथकाची पहिली महिला पथसंचलन सहाय्यक ठरणार?
(A) तानिया शेरगिल.  √
(B) भावना कस्तुरी
(C) अंजली गुप्ता
(D) भावना कांत

6)कोणाची ICCच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी ‘टिम ऑफ द इयर’ या संघांचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?
(A) स्टीव्ह स्मिथ
(B) विराट कोहली.  √
(C) केन विल्यमसन
(D) इओन मॉर्गन

7)‘ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाईल रिपोर्ट 2020’ याच्यानुसार कोणते शहर जगातले सर्वात महागडे शहर आहे?
(A) हाँगकाँग.   √
(B) न्युयॉर्क
(C) टोकियो
(D) लंडन

8)कोणत्या कंपनीने भारतात लघू व मध्यम व्यवसायांचे डिजिटलीकरण करण्यासाठी 1 अब्ज डॉलर एवढ्या रकमेची गुंतवणूक करण्याची घोषणा केली?
(A) अॅमेझॉन.  √
(B) वॉलमार्ट
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) इन्फोसिस

9)‘रायसीना संवाद 2020’ या बैठकीदरम्यान संरक्षण क्षेत्रात भारताने कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केला?
(A) रशिया
(B) ऑस्ट्रेलिया
(C) फिनलँड.  √
(D) इराण

10)कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबतीने राज्य पातळीवर ‘रेड लिस्ट’ तयार करण्यास प्रारंभ केला आहे?
(A) अरुणाचल प्रदेश.  √
(B) सिक्किम
(C) मेघालय
(D) आसाम

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...