🔳 भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाऊण टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा दर सध्याच्या ५ पूर्णांक १५ शतांश टक्क्यावरून ४ पूर्णांक ४ दशांश टक्के होईल.
🔳 रिझर्व्ह बँकेच्या नाणेविषयक धोरण समितीनं आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. रिव्हर्स रेपो दरात ९ दशांश टक्के कपात करून तो ४ टक्क्यावर आणला आहे. एम.एस.एफ. आणि बँक दरही ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यावरून ४ पूर्णांक ६५ शतांश टक्के केला आहे.
🔳 सी.आर.आर. अर्थात राखीव रकमेचं प्रमाण १ टक्क्यांनी कमी करून एक वर्षाकरता ३ टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे १ लाख ३७ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्यानं, त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हे निर्णय घेतले आहेत.
🔳 कोविड १९ च्या प्रादुर्भावानं उद्योगजगतासह सामान्य नागरिकांनाही आर्थिक चणचण जाणवत असल्याचं लक्षात घेऊन, बँकांनी पुढच्या तीन महिन्यांसाठी कर्जाची वसुली थांबवावी, असा सल्लाही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.
🔳 चालु आर्थिक वर्षात तसंच आगामी वर्षात स्थुल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीवर सद्यस्थितीचा परिणाम होईल, एकंदर मागणी घटेल, त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात अनिश्चितता आणि नकारात्मक परिणाम दिसतील, असं बँकेनं म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment