Monday, 30 March 2020

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता भारतात देखील आपले जाळे विस्तारण्यास झपाट्याने सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरी देखील देशभरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची चिन्ह दिसत आहे.

केंद्र सरकारने अद्यापही सरकारीन सूचनांना गांभिर्याने न घेणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशाला झुगारून छुप्या पद्धतीने स्थलांतर करणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य व जिल्ह्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की, प्रवासी कामगारांना ते आहेत त्या ठिकाणीच सर्व सुविधा मिळतील याची खात्री करून घ्यावी. एवढच नाहीतर कामगारांना वेळच्यावेळी वेतन दिले जावे, यासाठी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कामगारांना जागा खाली करण्यास सांगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment